रामदास आठवले म्हणतात, राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराला पाठींबा द्या

टीम महाराष्ट्र देशा : आरपीआयचे नेते रामदास आठवले हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. फलटणमध्ये महायुतीची सभा आयोजित केली होती. या सभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे रामदास आठवले चर्चेत आले आहेत.

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाषण करताना आठवले यांनी चुकून भाजपच्या रणजिंह निंबाळकर यांच्याऐवजी चक्क राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. त्यामुळे थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु प्रसंगावधान साधून आठवलेंनी सावरासावर केली व निंबाळकर नाव असल्याने आपल्याकडून चुकून रणजितसिंह निंबाळकर यांच्याऐवजी रामराजेंचा उल्लेख झाला असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दरम्यान, रामदास आठवले यांना जागावाटपात स्थान देण्यात आले नाही. परंतु त्यांना राज्यसभेचं आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे आठवले महायुतीचा प्रचार करत आहेत

Loading...