…. तर उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ ५० जागाचं मिळतील – आठवले

लखनऊ: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी स्थानप करण्याच्या तयारीत आहेत. जर ही महाआघाडी झाली तर यामुळे भाजपसाठी डोकेदुखी नक्कीच वाढेल, असं आठवले यांनी सांगितले.

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, लखनौ येथे बोलताना आठवले म्हणाले की, जर महाआघाडीची स्थापना झाली तर उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. जर विरोधकांची एकजूट झाली तर उत्तर प्रदेशात भाजपला केवळ ५० जागा जिंकता येतील. सध्या उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा भाजपकडे आहेत.

रामदास आठवले पुढे म्हणाले की, ‘राजकीय पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवणे सोपे नसते. निवडणुकीपर्यंत ठीक आहे, मात्र पुढील तडजोडी आणि इतर गोष्टी सोप्या नसतात. त्यामुळे महाआघाडी झाली तर उत्तर प्रदेशात त्यांना ३०-३२ जागा मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर आणि तो प्रयत्न यशस्वी झाला तर त्याचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही लोकांना आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती देऊ.असही आठवले यावेळी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...