‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध : आठवले

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. तसेच २०१९च्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४२पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू’, असा दावा आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

दलितांना पुढे करत मराठा समाजाकडून अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर – आठवले

नेमकं काय म्हणाले आठवले ?
‘हिंदू राष्ट्र या संकल्पनेला आमच्या पक्षाचा तीव्र विरोध आहे. भारतीय संविधानातील सेक्युलर या शब्दामुळेच भारताची एकात्मता मजबूत आहे. सेक्युलर शब्द काढला तर संविधान आणि राष्ट्राची एकता खिळखिळी होईल. त्यामुळे कोणीही मागणी केली तरी सेक्युलर शब्द संविधानातून निघणार नाही. तसा प्रयत्न झाला तर रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल’. ‘केंद्र सरकारमधील राज्यमंत्री म्हणूनही आपण सेक्युलर शब्दाविरुद्धचा जर कुणाचा डाव असेल तर तो उधळून लावू.

स्वयंघोषित गोरक्षकांनी मारहाण केलेल्या दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग