fbpx

क्रिकेटमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण द्या:आठवले 

 

वेबटीम: आपण आजपर्यंत नोकरी तसेच शिक्षणामध्ये आरक्षण देण्याची मागणी केल्याच ऐकली आहे . मात्र क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी आली तर…? ही मागणी जरी हास्यास्पद असली तरी ही मागणी खरोखरच करण्यात आली आहे.

आपल्या अजब-गजब वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे  केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता पुन्हा एकदा असंच अजब विधान केलं आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीच्या खेळाडूंना २५ टक्के आरक्षण देण्याची मागणी  केली आहे . आठवले साहेब एवढ्यावरच थांबले नाहीत तर  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत कसा हरला त्याची चौकशी करावी अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून मानहानीकारक हार पत्करावी लागली. अवघ्या १८० धावात भारताचा डाव आटोपला. मात्र त्याआधी साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत कसा हरला. त्याची चौकशी करावी, अशी आठवलेंची मागणी आहे. क्रिकेटमध्ये आरक्षणाची मागणी करून आठवले काय साध्य करू पाहतायत ते त्यांनाच ठाऊक मात्र पुराव्याशिवाय भारतीय संघावर आरोप करीत सुटणं हे एखाद्या केंद्रीय मंत्र्यांना शोभत नाही हे मात्र नक्की.