महायुतीतल्या चारही घटक पक्षांना मंत्रीपद मिळावे – रामदास आठवले

athawale-ramdas-

टीम महाराष्ट्र देशा :- भाजप शिवसेना महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटना या चार मित्र पक्षांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत गुरवारी पार पडली.महायुतीतील चारही घटक पक्षांना मंत्रीपद मिळावे आणि रिपाइंला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशा मागणीचा ठराव रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे.

यासोबत महामंडळाचे चेअरमन पद, तसेच जिल्ह्यातील समित्यांमध्ये घटक पक्षांना संधी मिळावी अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे.भाजप-शिवसेना यांनी महत्त्वाच्या खात्यांबद्दल चर्चा करून महायुतीचे सरकार स्थापनेबाबत निर्णय घ्यावा असा ठराव या बैठकीत करण्यात आल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

तसेच आम्ही लवकरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आमचा ठराव त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले. दरम्यान, या बैठकीला युतीतील घटक पक्षांचे नेते रामदास आठवले, अविनाश महातेकर, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची यावेळी उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या