तुम्ही माझे सामान बाहेर काढले, म्हणून मी तुम्हाला सत्तेतून काढले; आठवलेंचा कॉंग्रेसवर निशाणा

athawale

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कविता मोठ्या लोकप्रिय आहेत, आज नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आठवले यांनी कवितांमधून कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासोबत होतो, पण मी दिल्लीत ज्या बंगल्यात राहत होतो, तेथून यांनी माझ सामान बाहेर काढल, म्हणून मी ठरवल आणि यांना सत्तेतून बाहेर काढल, अशी टीका यावेळी आठवले यांनी केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नागपूरमध्ये सभा घेतली आहे, यावेळी रामदास आठवले देखील उपस्थित होते, आज विदर्भात आले आहेत अमित शहा, विदर्भात आम्ही जिंकणार जागा १०, नाना पटोलेकडे वाकड्या नजरेने पहा, आणि नितीन गडकरीसोबत रहा, अशी शाब्दिक कोटी यावेळी आठवले यांनी केली. नितीन गडकरी आहेत माझे जवळचे मित्र कारण माझ्या ह्रदयात आहे भीमाचे चित्र म्हणत आठवले यांनी उपस्थितांची दाद मिळवली.

दरम्यान, राहुल गांधी हे सतत नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत, मात्र तुम्हाला जेवढ बोलायचं तेवढ बोला, पण लोकांनो निवडणुकीत यांची पोलखोल, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. राहुल गांधी आता गरिबी हटाव म्हणतात, पण तुम्हीच गरिबांना हटवल्याची टीका त्यांनी केली आहे. भाजप आणि शिवसेना जातीयवादी नाहीत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची सर्वात जास्त काम भाजप सरकारने केल्याच आठवले म्हणाले.