‘राहुल गांधी पक्ष सांभाळू शकले नाही, देश काय सांभाळणार’

टीम महाराष्ट्र देशा :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाहीत, तर देश कसा सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित करत राहूल गांधींवर निशाना साधला आहे.

रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना मोदींवरही स्तुतीसुमने उधळली. पाच वर्षे चांगले काम करूनही काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेनेच ठरवले आहे की मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. जर राहुल गांधी काँग्रेस सांभाळू शकले नाहीत, तर देश कसा सांभाळणार असं विधान केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीचं आठवले यांनी आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेनेच्या युतीसोबत आहोत. युतीला २८८ पैकी २४० जागा मिळतील. यामुळे आम्हाला १० जागा हव्या असल्याची मागणी मांडलेली आहे असं विधान केले होते. त्यामुळे जागावाटप जाहीर झाल्यानंतर मित्रपक्षांना नक्की किती जागा मिळणार आणि त्यात आरपीआय किती जागा लढवणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Loading...

Loading...