fbpx

दलितांना पुढे करत मराठा समाजाकडून अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर – आठवले

ramdas aatahavle

मुंबई : दलितांना पुढे करून मराठा समाजातील लोक स्वार्थासाठी अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यामध्ये काही बदल केले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलीये.ते बारामतीत बोलत होते.

अनुसूचित जातीजमातीच्या लोकांचं कारण पुढे करून एक विशिष्ठ सवर्ण समाज अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करतोय.या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काही बदल केले जाणार असल्याची माहितीही आठवले यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून त्यांनी तयारी दर्शवल्यास आपण दोन पावले मागे घेत, त्यांच्यासोबत काम करण्यास तयार असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर राज्य सरकारनं बंदी आणावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेच्या भीतीनेच राणेंना राज्यसभेची ऑफर – रामदास आठवले

तर मी भाजपची साथ सोडेन- रामदास आठवले