‘मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस आग्रही’

मुंबई : मुस्लीम आरक्षणबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत कायदा करु आणि निर्णय घेऊ. तसेच वर्ष २०२०-२१ चे शैक्षणिक प्रवेश होण्याआधीच मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करुन ते लागू करण्याबाबत निर्णय घेणार असल्यची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विधानपरिषदेत दिली.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘ राज्यात आघाडी सरकार असताना या पूर्वीच मुस्लीम समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण मिळाले पाहिजे,’ असे थोरात म्हणाले.

Loading...

‘राज्यात शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबतची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर, काँग्रेसही त्यासाठी आग्रही असल्याचे,’ थोरात यांनी याबाबत बोलताना सांगितले.

दरम्यान, धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यास भाजपने विरोध केला आहे, मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आक्षणाला पाठिंबा दिला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात