राज्यसभेचे आश्वासन, आठवलेंची दक्षिण मध्य मुंबईतून माघार

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे लोकसभेतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading...

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु रामदास आठवले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत राज्यसभेचे आश्वासन दिले. आणि आठवले यांनी माघार घेतली.

माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी राज्यसभेचे आश्वासन दिले असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. त्यामुळे आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.Loading…


Loading…

Loading...