या वेळेस इतिहास घडणार, बारामतीचा बालेकिल्ला ढासळणार : आठवले

athawale

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या निवडणुकीत महादेव जानकर हे भाजपचे कमळ चिन्ह घेवून लढले असते तर बारामती हा पवारांचा बालेकिल्ला त्यावेळीच ढासळला असता. पण आता कांचन कुल या भाजाकडून लढणार आहेत त्यामुळे त्यांच्या रूपाने बारामतीत इतिहास घडणार आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कांचन कुल यांच्या उमेदवारी प्रती विश्वास व्यक्त केला. आज रामदास आठवले पुण्यातील पत्रकार परिषदे मध्ये बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देशामध्ये एनडीए चे सरकार पूर्ण बहुमताने येणार असून दलित समाजाचा भाजपला पाठींबा असणार आहे. तर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये कांचन कुल या इतिहास घडवणार असून बारामतीच्या बालेकिल्ला उद्धवस्त करणार आहेत.

तर यावेळी आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर देखील भाष्य केले ते म्हणाले की, महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही. याउलट तिसऱ्या आघाडीचा फायदा आम्हालाच होईल. तसेच, प्रकाश आंबेडकर यांनी आतून मदत करण्यापेक्षा डायरेक्ट भाजपला मदत करावी. इकडे आले तर त्यांना मंत्रिपद सुद्धा मिळू शकते त्यामुळे आंबेडकर यांनी भाजपसोबत यावे असे आवाहन देखील त्यांनी आंबेडकरांना केले.