सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय क्रांतीकारक : रामदास आठवले

blank

टीम महाराष्ट्र देशा – आयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हिंदु मुस्लिमांना समान न्याय देणारा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील सर्वधर्मसमभाव मजबूत करणारा क्रांतीकारक निर्णय असल्याचे सांगत या निर्णयाचे सर्वच देशवासियांनी स्वागत केले पाहिजे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल देताना हिंदूना 5 एकर जागा मंदिरासाठी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी 5 एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हिंदूंनी मंदिर बांधावे आणि मुस्लिमांनी त्यांना देण्यात येणार्या जागेवर मशिद बांधावी. या निर्णयाचे हिंदु मुस्लिमांनी स्वागत केले पाहिजे.हा निर्णय दोन्ही समाजाला न्याय देणारा असल्याने सर्वधर्मसमभावाचे तत्व मजबूत झाले आहे. वादग्रस्त जागेवरुन यापुढे कोणीही वादग्रस्त वक्तव्य करणार नाही. देशात सर्वांनी शांतता पाळावी. हिंदु मुस्लिमांनी एकत्र येवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. देशाला पुढे घेवून जाण्यासाठी हिंदू मुस्लिमांनी एकतेने नांदले पाहिजे असे ना. रामदास आठवले म्हणाले.

आयोध्येतील वादग्रस्त जागा मुळ बुद्ध विहाराची जागा होती. मात्र आम्ही हिंदु मुस्लिमांच्या मंदिर मशिदीच्या वादात बुद्ध विहाराची मागणी करुन नवीन वाद करण्याचे टाळले. देशात कुठेही आम्ही कुठेही बुद्धविहार उभारु शकतो. मात्र आयोध्येतील त्या वादग्रस्त जागेचे उत्खनन केल्यास तेथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष जरुर सापडतील. असे असले तरी आम्ही वाद वाढविण्यापेक्षा वाद मिटवण्याला महत्व दिले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय हिंदू मुस्लिमांना आणि सर्व देशवासियांना न्याय देणारा आहे. या निर्णयामुळे राममंदिर बांधू इच्छिणार्यां हिंदूच्या भावनांचा आणि मस्जिद बांधू इच्छिणार्यांना मुस्लिमांच्या भावनांचा आदर राखला गेला आहे.

संविधानातील सर्वधर्मसमभाव जोपासणारा भारत साकारणारा क्रांतीकारक अभ्यासपूर्ण निर्णय दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आपण रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मन:पूर्वक अभिनंदन करीत असल्याचे ना. रामदास आठवले यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या