बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंच्या सभेलाही गर्दी पण… : आठवलेंचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक संपली असताना सध्या राज्यात विधानसभेचे वारे सुरु आहे. दरम्यान राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने सर्व पक्षांच्या वतीने जिल्हा दौरा करण्यात येत आहे. याचदरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर जिल्यातील दुष्काळी भागांची पहानी केली. त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा मोठ्या होत आहेत. त्यांच्या सभांना गर्दीही पाहायला मिळत आहे. मात्र शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या सभाही मोठ्या व्हायच्या परंतु त्यांना मते मिळत नव्हती. तसेच राज ठाकरेंचे आहे. असे रामदास आठवले यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राज्यात आमच्या रोज सभा होत असतात. राज ठाकरे एकच सभा घेतात आणि सगळीकडचे लोक जमा करून गर्दी दाखवतात. कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना मोठे बळ दिले आहे. राज ठाकरेंच्या सभेला गर्दी कशी जमवायची याचे नियोजन त्यांच्याकडे आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच राज ठाकरेंच्या सभेने महायुतीला काहीही फरक पडणार नाही. असेही त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, रामदास आठवले यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण होणार असल्याची शक्यात वर्तवली जात आहे. तसेच आठवलेंच्या या वक्तव्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.