Share

Ramdas Athavle | शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, रामदास आठवले म्हणाले…

Ramdas Athavle | मुंबई : काल एमसीएची म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) निवडणूक (Election) पार पडली आहे.यामध्ये माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा एक पॅनल आहे तर दूसरा पॅनल राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे (BJP) नेते आशीष शेलार (Ashish Shelar) यांचा एक पॅनल आहे. या प्रक्रियेमध्ये राजकीय नेत्यांनीही मतदान केलं आहे. त्याचबरोबर 300 हून अधिक मतदान झालं असल्याची माहिती समोर येतं आहे. याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रामदास आठवले (Ramdas Athavle)

यावेळी रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या पॅनलचा विजय होईल अशी खात्री व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच शरद पवारांच्या गुगलीमध्ये ठाकरे यांचा क्लीनबोल्ड होणार असल्याचं म्हणत,रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्ला केला आहे.

पुढे बोलताना रामदास आठवले असंही म्हणाले की, शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्याशी दोस्ती करून उद्धव ठाकरे यांना आउट केले आहे, शरद पवार पुढील काळात ते लवकरच मोठी खेळी खेळतील. तसेच शरद पवार 2024 च्या निवडणुकीत मोदींसोबत येतील, ठाकरे कुटुंबावर गुगली टाकत मिलिंद नार्वेकर यांना सोबत घेतले आहे. ठाकरे यांना सोडून मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मंगळवारी एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि शदर पवार उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार म्हणाले, माझे सासरे हे शिंदे होते आणि ते उत्तम क्रिकेटर होते असा संदर्भ मिश्कीलपणे दिला. माझे सासरे शिंदे होते म्हणून शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी असा मिश्कील टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लवगला. माझे सासरे शिंदे होते.
महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athavle | मुंबई : काल एमसीएची म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) निवडणूक (Election) पार पडली आहे.यामध्ये माजी कसोटीवीर संदीप …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now