Share

Ramdas Athavle | “राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही, कारण…”; रामदास आठवलेंची राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया

Ramdas Athavle  | वर्धा : सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं दिसून येतं आहे.या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट देखील ही निवडणूक लढत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये राज यांनी भारतीय जनता पक्षानं पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. राज ठाकरे यांच्या पत्राला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे यांच्या पत्राला काही अर्थ नाही. राज ठाकरेंचं ते मत असलं, तरी निवडणूक लढली पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. काल (रविवार) रामदास आठवले नागपूरहून चंद्रपूरला जात असताना हिंगणघाट येथे कार्यक्रमासाठी गेले. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरेंनी भाजपने निवडणूक लढू नये असं पत्र लिहिलं. मात्र, त्याला काहीही अर्थ नाही. लोकशाहीत निवडणूक लढवणं आमचा अधिकार आहे. ते राज ठाकरेंचं मत असलं, तरी निवडणूक झाली पाहिजे, असं आमचं मत आहे. भाजपाने आपला उमेदवार उभा केला आहे आणि आरपीआयने त्याला पाठिंबा दिला आहे,” असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आहेत. मात्र, त्या ठिकाणी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (रिपाइं) भाजपाच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वचा गड आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येईल. तसेच, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्येही आरपीआयचा पाठिंबा भाजपाला राहणार असल्याचंही आठवलेंनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athavle  | वर्धा : सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामध्ये अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलेलं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now