लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे टाळून आठवलेंनी केला सपत्नीक मोदींचा निवडणूक प्रचार

वाराणसी : नरेंद्र मोदी हे दलितविरोधी नसून दलितांना पाठिंबा देणारे नेते आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा, संविधानाचे आदर करणारे मोदी आहेत.नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनविण्यासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जो पत्नीला सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही अशी कौटुंबिक पातळीवर जाऊन मायावती यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर केलेली टीका निषेधार्ह असून अशी वैक्तिक टीका आरोप मायावतींनी करू नयेत असे आवाहन रामदास आठवलेंनी केली. नरेंद्र मोदींवर त्यांच्या पत्नीने कोणताही आरोप किंवा तक्रार केली नाही त्यामुळे मायावतींनी मोदींवर अशी कौटुंबिक पातळीवरील टीका करू नये. अशी वैक्तिक पातळीवर टीका करणारे मनाने पराभूत मानसिकतेचे असतात. मायावतींना त्यांचा पराभव दिसत असल्यानेचत या मोदींवर वैक्तिक टीका करीत असल्याचा आरोप रामदास आठवलेंनी केला. वाराणसी बार असोसिएशनच्या सभागृहात ते बोलत होते.यावेळी 300 अधीक वकील उपस्थित होते.

रामदास आठवले हे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वाराणसी दौऱ्यावर सहकुटुंब आले आहेत. वाराणसी ही रामदास आठवले यांची सासुरवाडी आहे. आज दि.16 मे रोजी रामदास आठवले यांच्या लग्नाचा 27 वा वाढदिवस आहे. रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले आणि पुत्र जित आठवलेंसह सर्व आठवले परिवार आज वाराणसी दौऱ्यावर आले आहेत. रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले या दाम्पत्याने आपला लग्नाचा 27 वा वाढदिवस साजरा करण्याचे टाळून सर्व आठवले परिवाराने नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधामनमंत्री कारण्यासाठी त्यांचा प्रचार केला.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाराणसी बार असोसीएशन मध्ये वकिलांशी संवाद साधल्यानंतर वाराणसी लोकसभा मतदारसंघतात रथयात्रा; देहळुपूरा , चेतगंज या भागांत जनसंपर्क अभियान राबवित रोड शो केला. संध्याकाळी दलितांमधील बुद्धिजीवी वर्गातील पत्रकार,साहित्यिक, विचारवंतांशी रामदास आठवलेंचे चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते.

येत्या दि.23 मे ला जो निकाल लागेल त्यात दूध का दुध आणि पाणी का पाणी स्पष्ट होईल.विरोधकांनी कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात पुन्हा एनडीएचेच सरकार निवडून येईल असा विश्वास ना रामदास आठवलेंनी व्यक्त केला. देशभरातील दलित एनडीए च्या बाजूने उभा करण्याचा प्रयत्न मी केला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानातील भारत साकारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला रिपब्लिकन पक्ष एनडीए सोबत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान कायदेपंडित होते.त्यांनी देशात समाज जोडणारी भूमिका घेतली आहे.विरोधक नरेंद्र मोदींवर चुकीची टीका करीत असतात. विरोधक हे समाज जोडणारी भूमिका न घेता समाज तोडणारी आतततायी भूमिका घेतात. अशी भूमिका आंबेडकरी विचारांत बसत नाही असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.