fbpx

मायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले

नवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.मायावती या समाजातील खंबीर नेत्या आणि प्रशासक आहेत. माझ्या पक्षातील कोणीही त्यांच्याविषयी असं वक्तव्य केलं असतं तर मी नक्कीच कारवाई केली असती, असंही आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, मायावती यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.

मायावती ना पुरुष आहेत ना महिला आहेत, त्या तृतीय पंथीयांपेक्षा वाईट आहेत, त्या महिला जातीला कलंक आहेत, असे वादग्रस्त विधान साधना सिंह यांनी केले.साधना सिंह यांनी मायावती यांच्यावर अत्यंत हीन पातळीवर टीका केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस धाडून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

आप आमदार अलका लांबा यांनीही साधना सिंह यांच्या टीका केली. मायावती ५६ इंचवर भारी असल्याची खोचक त्यांनी लांबा यांनी केली.