खड्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी खड्ड्यात जाऊन सेल्फी काढा – रामदास आठवले

ramdas aathavle

टीम महाराष्ट्र देशा – खड्ड्यांसोबत सेल्फी काढणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खड्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी खड्ड्यात जाऊन सेल्फी काढावेत असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यात फिरताना खड्डा दिसला की त्याच्यासोबत सेल्फी काढून तो सोशल मिडियावर टाकत आहेत. परंतु हे खड्डे हे तीन वर्षातील नसून तर गेल्या पंधरा वर्षातील आहेत. उलट आम्ही खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली आहे.

शिवसेनेन राज्य सरकारचा पाठींबा काढला तरी सरकारला काही फरक पडणार नाही. तसेच ते सत्तेतून बाहेर पडल्यास आपण शरद पवार यांना भेटून सरकारसाठी पाठींबा मागू अस विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच शिवसेनेन भाजपशी दुष्मनी करू नये , सत्तेत राहून विरोध करन बंद कराव असा सल्ला देखील आठवले यांनी दिला आहे.

२०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात सरकार अस्थिर होऊन देणार नसल्याचा दिलेला शब्द आपण त्यांना आठवणीत आणून देणार असल्याचहि आठवले यांनी सांगितल आहे.