‘गरिबांच्या आरक्षणाला विरोध करणे हे बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करण्यासारखे’

मुंबई : केंद्र सरकारने आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. गरिबांच्या आरक्षणाला विरोध करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विरोध करण्यासारखे असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

या निर्णयामुळे अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि सवर्ण वर्गात होणारा संघर्ष कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. सर्वच सवर्ण श्रीमंत नसतात या विचारातून मराठा समाजातील गरिबांना आरक्षणाची आम्ही मागणी केली असं देखील ते म्हणाले.

दरम्यान,आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा ४९. ५ टक्क्यावरून वाढून तो ५९.५ टक्क्यांवर पोहोचणार आहे.

You might also like
Comments
Loading...