fbpx

बाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा

औरंगाबाद : नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटसमोर केंद्रीय राज्यमंत्री, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भारिपचे अध्यक्ष अ;ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करण्यात आल्यामुळे उपस्थितांनी गोंधळ घातला. खुर्च्यांची फेकाफेक करत तोडफोड करण्यात आली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला.

रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंची सभा सुरु असताना सूत्रसंचालन करणारे मिलिंद शेळके यांनी बाबासाहेबांचा नातू म्हणून घेणारा चोर आहे, असे उद्गार काढताच समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय संतप्त झाला आणि खुर्च्यांची मोडतोड करू लागला.

या सभेला पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. हा गोंधळ सुरु झाला तेव्हा प्रसंगावधान राखून जमावाला शांत करण्यासाठी पोलीस धावले. लाठीचार्ज न करता जमावाला शांत करीत जागेवर बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त तरुणांनी खुर्च्यांची प्रचंड मोडतोड करीत घोषणाबाजी केली.