देवेंद्र फडणवीस यांना रामदास आठवलेंनी केली मोदींना भेटण्याची सूचना!

मुंबई : मराठा आरक्षणासह विविध विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींची भेट घेण्याची सूचना केली आहे.

या संदर्भात आठवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. आठवले यांनी लिहिले की, ‘राज्यातील प्रश्नांवर महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यावी. मराठा आरक्षण; पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण; तोक्ते वादळग्रस्तांना मदत आदी राज्यातील विषयांवर फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी अशी सुचना केली.’

मुख्यमंत्र्यांनी सांगितले असते तर मोदींना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत आनंदाने गेले असतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यावरही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती. मात्र, महाराष्ट्राच्या हितासाठी आपण कायम तत्पर असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. आता आठवले यांनी त्याच प्रश्नांवर मोदींची भेट घेण्याची सूचना फडणवीस यांना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP