पुणे महापालिकेकडून रामदास आठवलेंवर राजशिष्टाचार भंगाचा ठपका

रामदास आठवले

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमात झालेल्या राजशिष्टाचार भंगाचा ठपका महापालिका प्रशासनाने केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर ठेवला आहे. वाडिया महाविद्यालयानजिकच्या एका उद्यानात महापालिकेने उभारलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण महिनाभरापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यात राजशिष्टाचारांचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती कार्यालयाने महापालिकेकडे खुलासा मागितला होता.

कार्यक्रमाचे नियोजन महापालिकेकडे होते. त्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाकडे दिली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वतः हजर राहणार असल्याने राजशिष्टाचाराबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अनेक सूचना पुणे महापालिकेला देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे पालन झाले नाही.

प्रत्यक्षात पुतळ्यावरील पडद्याचे अनावरण रिमोटने करण्याऐवजी दोरीने करण्यात आले. कार्यक्रम संपवून राष्ट्रपती निघालेले असताना ऐनवेळी त्यांना पुतळ्याजवळ थांबवून त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्यात आली. त्यावेळी राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पुणेमहापालिकेकडे खुलासा मागितला असता, याला रामदास आठवले जबाबदार असल्याचा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी सर्वपक्षीयांचं एकमत व्हावं: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी निळा झेंडा घेऊन सत्तेत आहे – रामदास आठवले

1 Comment

Click here to post a comment