पूनावाला यांना धमकी देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी

नवी दिल्ली : सीरम इन्सिट्यूटकडून कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसची निर्मिती केली जात आहे. मात्र, लस पुरवठ्याबाबत सीरम इन्सिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांना धमकी दिली जात असल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे या प्रकरणात धमकी देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांच्या धमकीविषयी आठवले यांनी सोशल मीडियावर लिहिले की, ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना धमकी देण्यात आली असून ही घटना गंभीर आहे. सरकारने या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी करुन त्यांना धमकी कोणी दिली याचा तपास करावा. तसेच अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.’

या प्रकरणात देशात राजकीय पक्षांच्या वतीने प्रतिक्रीया देण्यात येत आहे. पूनावाला यांना केंद्र सरकारच्या वतीने आधीच सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र, तरीही पूनावाला हे देशाबाहेर गेलेले आहेत. तसेच त्यांनी विदेशातच लस निर्मिती सुरू केली असल्याचे वृत्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या