राज नका करू जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई मध्ये भाजप युतीच्या प्रचाराच्या तोफा कडाडत आहेत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या काव्यात्मक शैलीतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज तुम्ही करू नका जास्त नखरे कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत आठवलेंनी आपल्या भाषणातून राज यांना टोला लगावला आहे.

Loading...

यावेळी आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आधीच ५६ विरोधक एकत्र आले आहेत. त्यात आता ५७ नंबरला राज ठाकरे आले आहेत. तरीही आम्हाला काही फरक पडणार नाही. तसेच सभेला गर्दी करण्याच्या नियोजन राज ठाकरेंकडे आहे, पण उमेदवार कसे निवडून आणायचे हे नियोजन आमच्याकडे आहे, असा टोला आठवलेंनी लागवला.

पुढे आठवले यांनी राज ठाकरे यांच्या दुट्टपी भूमिकेचा देखील समाचार घेतला. आठवले म्हणाले की, आठ दिवस राज ठाकरे गुजरात मध्ये राहून आले होते. गुजरात मधील विकास कामांची स्तुती केली होती. महाराष्ट्र सरकारने गुजरातिची भूमिका स्वीकारावी असे राज म्हणाले होते. मात्र तेच राज ठाकरे आता पंतप्रधान मोदींवर आज टीका करत आहे. बाळासाहेब ठाकरे देखील टीका करत होते. मात्र अशा पद्धतीची टीका त्यांनी केली नव्हती, हा फरक देखील आठवलेंनी यावेळी स्पष्ट केला.Loading…


Loading…

Loading...