fbpx

बाळासाहेबांच्या सभेला देखील मोठी गर्दी व्हायची पण त्यांना मतं मिळत नव्हती : आठवले

आठवले

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीही सभा मोठी व्हायची, पण त्यांना मतं मिळत नव्हती. सभा मोठी झाली म्हणून सगळी मतं मिळतील असं नाही असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर – असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीवर बोलताना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले ?
‘भारिप-एमआयएमच्या आघाडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही .त्यांची युती आमच्याच फायद्याची असून भाजपा – आरपीय युतीला याचा फायदा होईल. नरेंद्र मोदींबद्दल लोकांचं चांगलं मत आहे, त्यांच्या युतीचा आम्हाला फायदा होईल. कार्यकर्ते आणि जनता आमच्यासोबत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभेला खूप गर्दी व्हायची, पण त्यांना मतं मिळत नव्हती’.

सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार – आठवले