मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिकाही बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी कोणीही आले तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील, असे वक्तव्य ‘रिपाई’चे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे.
यासंदर्भात मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना रामदास आठवले म्हणाले की, ‘आमच्या पक्षाचे लोक मशिदींचे संरक्षण करतील. भोंगे काढायला आलेल्या लोकांनाही विरोध करतील. मशिदींवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो.’ मुस्लीम समुदायाने शांतता बाळगावी. तसेच मुस्लीम समजातील चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मौलानांनी शांत राहिले पाहिजे, असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी याविषयी बोलत असतांना ‘राज ठाकरेंनी ज्या लाऊडस्पीकरला हटवायचे म्हटले आहे त्याला आमचा पाठिंबा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे मूळच सर्व धर्मांना समान हक्क असायला हवे, असे आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते ३ मे पासून मशिदींचे रक्षण करतील’, असे रामदास आठवले म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर कुणी मानसिक रोगी आहे”, जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- “पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “बच्चा, बच्चा है बाप ‘बाप’ है” ; नवनीत राणांनी मोदींवर केली होती टीका, VIDEO व्हायरल
- “स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला
- पुन्हा एकदा मास्क सक्ती?; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण