fbpx

रामदास आठवले यांच्याकडून माहुलच्या भयग्रस्त रहिवासीयांना सुरक्षेसाठी पुनर्वसनाचे आश्वासन

ramdas aathvale

मुंबई – मुंबईच्या विविध भागांतील प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले असून, नागरीसुविधांन अभावी प्रदूषित वातावरणात जगणाऱ्या रहिवासीयांचे जीवन धोक्यात आले आहे. येथील भारत पेट्रोलियम च्या प्रकल्पात नुकताच मोठा स्फोट झाल्याने या प्रकल्पग्रस्तांध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. माहुल च्या या भयग्रस्त राहिवासीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट घेऊन धीर दिला.

येथील भयग्रस्त राहिवासीयांच्या अडचणी समस्या गाऱ्हाणी ऐकून घेऊन त्यांचे सुरक्षित योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले.प्रकल्पग्रत राहिवासीयांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन ना रामदास आठवलेंना यावेळी देण्यात आले. वसाहती समोरील भारत पेट्रोलियामला जर आग लागली तर येथून बाहेर पडण्यास येथील राहिवासीयांना मार्गच नसल्याने हे रहिवासी भयभीत झाले असल्याचे राहिवासीयांनी रामदास आठवलेंना सांगितले.

यावेळी ना रामदास आठवलेंनी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती समोरील भारत पेट्रोलियम प्रकल्पात झालेल्या स्फोटाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; महाराष्ट्र्र उपाध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे; चंद्रशेखर कांबळे; हसन शेख ; सुमीत वजाळे;संजय डोळसे; हेमंत रणपिसे; रवी गायकवाड आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

“हा पुतळा कोणाचा ? आहे माझाचंं मेणाचा !” – रामदास आठवले 

 

1 Comment

Click here to post a comment