रिपाई कार्यकर्त्यांमध्ये रामदास आठवलेंसामोरच तुफान हाणामारी

ramdas-athawale-l

लखनऊ: राजकीय पक्षांमध्ये हाणामारीचे सत्र सुरूच आहे. रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये रामदास आठवले यांच्यासमोरच हाणामारी झाली. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे लखनऊमध्ये रिपाईच्या बैठकीसाठी गेले होते. तेव्हा रिपाईच्या दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ करायाला सुरुवात झाली आणि नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. रामदास आठवले मात्र हे प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करत होते.

Loading...

राजा बख्श आणि जवाहर लाल या देन नेत्याच्या वर्चस्ववादाच्या लढाईमुळे एकाच पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. रिपाईंचे राजा बख्श हे बैठक संपल्यानंतर आठवले यांना भेटण्यासाठी जात होते त्यावेळी त्यांना अडविण्यात आले. त्यांना गाडीत बसलेल्या उपाध्यक्षाने धक्का दिला आणि याला जवळ येऊ देऊ नका असे त्याच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले. रामदास आठवले तेव्हा गाडीमध्येच होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह दिसताच त्यांनी कसंबसं दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या बख्श यांनी आठवले यांना प्रश्न विचारला की “कालपरवा पक्षात आलेली मंडळी आम्हाला धक्के मारतायत, आमची बेइज्जती करतायत यांची औकात काय आहे ?”

राजा बख्श यांनी ४० वर्ष पक्षाच काम केल्याचा दावा केला आहे. तसेच स्वत:ला कार्यकारी अध्यक्ष म्हणवणाऱ्या जवाहर लाल यांनी पक्षात फूट पाडायला सुरुवात केल्याचं बख्श यांचं म्हणणं आहे. त्यांनीच आपल्याला आठवलेंना भेटण्यापासून रोखलं, शिव्या दिल्या आणि मारहाण केली असा आरोप बख्श यांनी केला आहे.Loading…


Loading…

Loading...