रामदास आठवले यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी ईशान्य मुंबईत रिपब्लिकन पक्ष काढणार ईशारा रॅली

ramdas-athawale

मुंबई : शिवसेना भाजप यांच्यात ईशान्य मुंबई मतदारसंघावरून टोकाचा वाद सुरू आहे हा वाद मिटविण्यासाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा येथून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी उमेदवारी लढवावी या मागणीसाठी ईशान्य मुंबईत रिपब्लिकन पक्षातर्फे ईशारा रॅली काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार सुरू झाला असताना ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराने प्रचारही सुरू केला आहे.

मात्र, भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचा अजून उमेदवार ठरत नाही. शिवसेना भाजप ने वाद करीत बसण्यापेक्षा ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली पाहिजे असा आंबेडकरी जनतेचा दबाव जिल्ह्यात निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक उद्या रविवार दि.31 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता घाटकोपर पश्चिम एल बी एस रोड भारत पेट्रोल पंप समोर पंकेशा बाबा दरगाह जवळ आरपीआय ईशान्य मुंबई जिल्हा कार्यालयात आयोजित केली आहे.

या बैठकीत गोवंडी ते मुलुंड अशी ईशारा रॅली काढण्याबाबत निर्णय घेऊन तपशील ठरविण्यात येणार आहे.या बैठकीस आरपीआय चे राष्ट्रीय नेते अविनाश महातेकर,मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर महिला आघाडी महाराष्ट्र्र अध्यक्षा आशाताई लांडगे; मुंबई अध्यक्षा अभयाताई सोनवणे हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आरपीआय चे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी दिली आहे. ईशान्य मुंबईच्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड यांनी केले आहे.