राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला रामदास आठवले यांनी ठरवले बालिश

टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा दहशतवादी हल्ला हा राजकीय खेळी असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे याचं हे वक्तव्य बालिशपणाच असल्याची टीका केली आहे.

यावेळी रामदास आठवले पुढे म्हणाले की, जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ला घडवून आणला. मात्र, पंतप्रधान मोदींनी हा हल्ला घडवून आणल्याच सांगणं हे अतिशय बालिशपणाचं लक्षण आहे. तसेच एअर स्ट्राईक करुन बदला घेतला, पण विरोधक म्हणातायेत की निवडणुकांच्या उद्देशाने हा स्ट्राईक केला आहे. जर बदला घेतला नसता, तर म्हटले असते या सरकारने काहीच केले नाही. मला वाटतं एअर स्ट्राईकवरुन राजकारण करू नये, असे म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना चांगलाच टोला लगावला.

Loading...

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मागील दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी पुलवामा हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय चाल असल्याच वाद ग्रस्त वक्तव्य केलं होत त्यामुळे राज ठाकरे यांना सामाजिक स्तरातून देखील रोषाला सामोरे जावे लागले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश