संविधानच संरक्षण करण्यासाठीच मोदींच्या मंत्रिमंडळात – आठवले

संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही सरकार बदलू

पुणे: भाजपचे मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आमचे सरकार संविधान बदलण्यासाठी सत्तेत आल्याचे व्यक्तव्य केले होते. हेगडे यांच्या विधानावर चारी बाजूने टीका केली जात आहे. दरम्यान भाजपने हेगडेंना समज द्यावी तसेच जर कोणी संविधान बदलण्याची भाषा केली तर आम्ही त्यांनाच बदलू असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

दरम्यान, हेगडे यांच्या वक्तव्यावर संसदेत खुलासा करण्यात आलं आहे. तसेच नरेंद्र मोदी हे संविधांला धर्मग्रंथ मानून शासन चालवतात. त्यामुळे दलितांनी हे सरकार संविधान बदलेल ही भावना काढून टाकावी असेही आठवले यांनी सांगितले आहे. तसेच मी संविधानच संरक्षण करण्यासाठीच मोदींच्या मंत्रिमंडळात असून भाजपने वाचाळ नेत्यांना समज द्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.