आरक्षण हे दलितांवरील अत्याचाराचे मुख्य कारण – आठवले

पुणे: इतर समाजातील मुलांपेक्षा दलित समाजातील मुलांना दोन तीन मार्क कमी असले तरी त्यांना ऍडमिशन मिळते. त्यामुळे इतर समाजातील लोकांना त्याचा राग येतो आणि त्यामुळे दलितांवरील अत्याचाराच्या घटना घडतात. हे सर्व रोखण्यासाठी इतर समाजातील गरजू लोकांनाही आरक्षण मिळायला हवं असल्याचं विधानसभा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं सांगितलं आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही सरकार बदलू

भाजपचे मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी ‘ आमचे सरकार संविधान बदलण्यासाठी सत्तेत आल्याचे व्यक्तव्य केले होते. हेगडे यांच्या विधानावर चारी बाजूने टीका केली जात आहे. दरम्यान भाजपने हेगडेंना समज द्यावी तसेच जर कोणी संविधान बदलण्याची भाषा केली तर आम्ही त्यांनाच बदलू असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

You might also like
Comments
Loading...