दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा यंदा राजस्थानात खंडित होणार – रामदास आठवले 

टीम महाराष्ट्र देशा –  राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताधारी  राज्यसरकार उलथवून लावण्याची परंपरा येथील मतदारांनी पाळली आहे. मात्र यंदा होणाऱ्या निवडणुकीत राजस्थानात दर 5 वर्षांनी सत्ताधारी राज्यसरकार  बदलण्याची परंपरा राजस्थानची जनता खंडित करणार असून पुन्हा मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या नेतृत्वात भाजप रिपाइं चे सरकार निवडून देणार असल्याचा विश्वास  व्यक्त करून राजस्थानात भाजप रिपाइं च्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.  अलवर जिल्ह्यातील मुंडावर विधानसभा मतदारसंघात  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विजयकुमार यांच्या जाहीर प्रचार सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे राजस्थान प्रदेश अध्यक्ष राधामोहन सैनी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे स्वबळावर 14 उमेदवार निवडणूक लढत असून अन्य 186 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला अधिकृत पाठिंबा दिला असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी यावेळी केली.
Rohan Deshmukh
राजस्थानात मागील 5 वर्षांच्या काळात मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी चांगले काम केल्याने तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा करिष्मा राजस्थानात दिसणार असल्याने या निवडणुकीत पुन्हा भाजप चा विजय होणार आहे.  राजस्थानात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी  पक्षाला पराभूत करण्याची राजस्थानी मतदारांची विचार करण्याची पद्धत असते.त्यानुसार यापूर्वी अनेक राज्यसरकार राजस्थानी मतदारांनी पराभूत केली आहेत. यंदा मात्र मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचे सरकार राजस्थानी मतदार पडणार नसून पुन्हा निवडून आणणार आहेत. भाजप चेच सरकार पुन्हा निवडून येईल असे सांगत राजस्थानात भाजप आणि रिपाइं च्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
Latur Advt
You might also like
Comments
Loading...