बाबासाहेब हे नक्षलवादाला पाठिंबा देणारे नव्हते,आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

टीम महाराष्ट्र देशा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच होऊन गेले. त्यांच्या प्रमाणे दुसरे कुणी होणे नाही. बाबासाहेब हे माओवाद व नक्षलवादाला पाठिंबा देणारे नक्कीच नव्हते, असा अप्रत्यक्षपणे टोला राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता लगावला आहे. नागपुरातील डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित डॉ. पूरणचंद्र्र मेश्राम कार्यगौरव सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

पॅन्थरच्या चळवळीत भिंती रंगविण्यापासून पोस्टर लावण्याचे काम केले. नागपुरात उंटखाना येथील पॅन्थरच्या कार्यालयात राहिलो. या दरम्यान कधी उपाशीही झोपलो. कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा असल्याने आम्ही संपूर्ण नागपूर सायकले पिंजून काढत होतो असं म्हणत आपल्या चळवळीतील दिवसांच्या आठवणींना देखील आठवले यांनी उजाळा दिला.

पॅन्थरमध्ये ब्राह्मणांवर शिव्याशाप व्हायचा. मात्र चळवळ हाती आल्यानंतर आम्ही ब्राह्मण्यवादाचा विरोध केला. ब्राह्मणांचा विरोध केला नाही. बाबासाहेबांच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात ब्राह्मण होते. त्यांनी कधीही ब्राह्मणांचा द्वेश केला नाही. त्यांचा लढा ब्राह्मण्यवादा विरोधात होता, असेही त्यांनी सांगितले.

bagdure

एमआयएम-भारिप युती, आगामी निवडणुका सोबत लढणार

दलितांना पुढे करत मराठा समाजाकडून अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर – आठवले

You might also like
Comments
Loading...