कोरेगाव भीमा दोषींवर कारवाई करा; रामदास आठवलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसेला दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

शौर्यदिनाला कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारानंतर रामदास आठवले यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याने आंबेडकरी जनतेचा रोष आठवलेवर आला आहे. तर दुसरीकडे आठवलेंच्या पाठींब्याविना प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे येत्या रामदास आठवले यांचे अनेक समर्थक आंबेडकर यांच्यासोबत गेल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पंतप्रधान अजूनही गप्प का आहेत असं विचारलं असता त्यांनी नरेंद्र मोदींची पाठराखण करत प्रत्येक विषयावर पंतप्रधानांनी मत देण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे जिग्नेश मेवानीला या प्रकरणी दोषी धरता येणार नसल्याचही त्यांनी म्हंटल आहे.

You might also like
Comments
Loading...