fbpx

‘वंचित बहुजन आघाडीमुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची आठवलेंना वाटतेय भिती’

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीमुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेयांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपकडून सोडण्यात येणाऱ्या १८ पैकी १० जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात अशी अजब मागणी आठवले यांनी केली आहे.

आठवले म्हणाले,‘वंचित आघाडी’ ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. काही ठिकाणी उमेदवाराचीच ताकद जास्त असल्याने त्यांनी मते खाल्ली. त्यामध्ये ‘वंचित’च्या प्रभावाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता ‘एनडीए’सोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही असं देखील त्यांनी सांगितले आहे.