‘पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागणार नसल्याचं लक्षात आल्याने पवारांनी माघार घेतली’

कोल्हापूर – केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदींसोबतच राहणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पवारांचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय योग्य असून मी त्याचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचं सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असा टोला आठवलेंनी लगावला.

शिवसेनेनं मुंबईची एक जागा मला सोडायला हवी होती. उद्धव ठाकरे यांनी मोठं मन दाखवावं आणि मला जागा सोडावी, अशी मागणी आठवेंनी केली आहे. दोन जागा देणं शक्य नसेल तर एक तरी जागा आमच्या पक्षाला द्या. दोघा नेत्यांनी ते ठरवावं आणि एक जागा रिपाइंला द्यावी. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र यायचं, हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांच आहे. त्यामुळं आमच्या पक्षाला जागा देण्याचा विचार करावा, असे आठवलेंनी म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट