fbpx

भिडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी : आठवले

ramdas aathavle

टीम महाराष्ट्र देशा- भीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़ असं विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी काल नगरमध्ये आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आठवले ?

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे घटनेच्या विरोधात व मनुस्मृतीचे समर्थन करत असल्याने ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे दाखवून देण्यासाठी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी. भीमा-कोरेगाव दंगलीशी नाव जोडले गेलेले संभाजी भिडे हे सर्वत्र फिरून वाद्ग्रस्त वक्तव्य करत आहेत. पोलीसांनी भिंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करून कडक कारवाई करावी. भिंडेंचे वक्तव्य जरी तपासले तरी पुरावे मिळतील़. भाजप सरकारच्या काळात हिंदुत्वावादी अधिक आक्रमक होत असल्याचा आरोप चुकीचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाना घेऊन पुढे जात आहेत.