उत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले

blank

पंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता उत्तर भारतीयांची जवळीक साधत आहेत. यापुढेही त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून, उत्तर भारतीयांशी अशीच जवळीक ठेवावी असा सल्ला सामाजिक व न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आठवले यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रातील मराठी जनता देखील विविध राज्यात राहते त्यांचे रक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे राज ठाकरे ने देखील महाराष्ट्रात इतर प्रांतातून आलेल्या जनतेच्या इतर भाषिक लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. व त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावे असं म्हणत ठाकरे यांच्यावर आठवले यांनी स्तुतिसुमने उधळली.

रामदास आठवले यांच्याकडून माहुलच्या भयग्रस्त रहिवासीयांना सुरक्षेसाठी पुनर्वसनाचे आश्वासन