नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादाचा बुरखा पांघरुन कांगावा करु नये : रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा-  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शांततावादी होते. आम्ही दलित पँथरमध्ये असताना माओवाद्यांपेक्षा अधिक खतरनाक होतो, त्या वेळी आम्हाला कोणी पकडले नाही. माओवादी किंवा नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादाचा बुरखा पांघरुन कांगावा करु नये, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी आज, काल नगरमध्ये आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आठवले ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शांततावादी होते. आम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही खतरनाक आहोत. पण पोलीसांनी आम्हाला कधी अटक केली नाही. कारण आम्ही जनहित आणि देशहितासाठी काम करतोत. काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या विचारवंतांविरोधात ते नक्शलवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे असल्याचे पोलीस सांगत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. नक्षलवादी विचारसरणी असणा-यांनी आंबेडकरवादी असल्याचा बुरखा पांघरू नयेमाओवाद्यांचे हिंसक कारवायांशी संबंध असल्यानेच पोलिसांनी त्यांना पकडले आहे.

You might also like
Comments
Loading...