fbpx

‘आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे असेल तर रिपाइंसाठी लोकसभेची जागा सोडावीच लागेल ‘

ramdas-athawale-l

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत विजयासाठी शिवसेना भाजप महायुतीला आंबेडकरी जनतेचे मतदान महत्वाचे वाटत असेल तर त्यांना रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेचा एक मतदार संघ सोडावा लागेल. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपाइंतर्फे आपण उमेदवारी लढविणार आहोत. शिवसेना भाजप युती झाली तरी ही जागा रिपाइंसाठी सुटेल किंवा सेना भाजप युती झाली नाही तरी रिपाइंला ही जागा सुटेल. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत मी निश्चित लोकसभा निवडणूक लढविणार आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चेंबूर वाशीनाका येथील गोपीनाथ मुंडे मैदानात आयोजित रिपाइंच्या जाहीर सभेत केले.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील वास्तवस्तिशी माझा वर्षोनुवर्षे जवळचा संबंध राहिला आहे. या मतदारसंघात मी निवडणूक लढविण्याचा निर्णय राहुल शेवाळे यांच्यावर अन्याय करण्यासाठी घेतलेला नाही. हा मतदारसंघ रिपाइं ला सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा हा मतदारसंघ रिपाइंला सोडण्याबाबत माझा प्रस्ताव ऐकतील असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन पक्ष नेहमी झोपडपट्ट्यांचे प्रश्न सोडविण्यास अग्रणी राहिला असून या पुढेही राहणार आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील माहुलच्या रहिवासीयांचे प्रश्न आपण सोडविणार; पंजारपोळ येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच कोळीवाडा गुरूतेग बहादूर नगरमधील घरांच्या मालकी हक्कांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे ना रामदास आठवले म्हणाले. यावेळी मोठया प्रमाणात रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.

“हा पुतळा कोणाचा ? आहे माझाचंं मेणाचा !” – रामदास आठवले