सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले

blank

मुंबई : सामना पेपर चालवणं हे सोपं काम आहे. मात्र, कोरोनाचा सामना करणे हे सोपे काम नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलेलं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री रामदास आठवले टोला लगावला आहे.

आज जर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतं तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर उतरले असते. सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत. अशाने या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्या साठी शरद पवार यांनी शिवसेने सोबत राहू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीत दलितांवरील अत्याचार वाढले
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आणि लॉकडाऊन काळात दलितांवर हल्ले करण्यात आले. दलितांना न्याय मिळणार आहे की नाही. दलित भारताचे नागरिक आहेत की नाहीत. दलितांना संरक्षण देणार आहात का? असे प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत. दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी रिपब्लीकन पक्ष ठिकठिकाणी आंदोलनं करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘राजकीय हितासाठी कॉपी बहाद्दर सरकारचा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ,विद्यार्थ्यांच्या आरोग्य काळजीचे दावे खोटे’

लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून पुण्यात कलगीतुरा, बापटांनी अजित पवारांवर केली शेलक्या शब्दात टीका

पक्ष, राजकारण यापलिकडे जाऊन मनसेच्या ढाण्या वाघाने घेतली इंदोरीकर महाराजांची भेट