fbpx

आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा प्रयत्न सर्व ताकदीनिशी हाणून पाडू- आठवले

रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आरक्षणासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी आर्थिक दृष्ट्या दुबळ्यांनाच फक्त आरक्षण मिळालं पाहिजे असं वक्तव्य केलं होत . या वक्तव्याचे आता राजकीय प्रतिसाद उमटू लागले आहेत. आधी जातिव्यवस्था नष्ट करा, मग जातीआधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सर्व ताकदीनिशी तो हाणून पाडू असा थेट इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत राज ठाकरे हे पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर घेतली होती .यावेळी आरक्षणासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी आर्थिक दृष्ट्या दुबळ्यांनाच फक्त आरक्षण मिळालं पाहिजे असे वक्तव्य केले होते. मात्र आठवले यांनी पवारांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे तसेच कडक शब्दात सुनावलं आहे. पवारांच्या भूमिकेस आपला विरोध असल्याचे आठवले यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे प्रसिद्धी पत्रकात 
या देशात जाती आहेत, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार. दलित, आदिवासी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातिव्यवस्था नष्ट करा, मग जातीआधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सर्व ताकदीनिशी तो हाणून पाडू .जाती नष्ट झाल्याशिवाय जातीआधारित आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा; लिंगायत; ब्राह्मण आदी सवर्ण समाजातील आर्थिक दुर्बलांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून ७५ टक्के करण्यात यावी. तसे झाल्यास सर्वाना आरक्षणाचा लाभ मिळून आरक्षणावरून होणारी भांडणे मिटतील .