पवारांचे वय झाले, महाराष्ट्रात फडणवीस, ठाकरे आणि मीच पैलवान

Reservation for Scheduled Castes and Tribes in Army

पुणे : राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. खासदार गिरीश बापट, रिपाइंचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला ५ जागा मिळाल्या आहेत. १५ च्या आसपास जागा महापालिकेत देण्याचे आश्वासन दिले आहे. उपमहापौर देखील. कँन्टोन्मेंट मिळावी असी अपेक्षा होती. मात्र, नाराजी दूर झाली आहे. २३० ते २४० महायुतीच्या जागा निवडून येतील. स्वतंत्र गट म्हणून आरपीआयला मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

इव्हीएममध्ये कोणताही दोष नाही. पण माणसांची मनाची मशिन आमच्या सोबत आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे जिंकले तेथे इव्हीएम नव्हते का? त्यामुळे यावर संशय घेणे योग्य नाही. राज ठाकरे यांचा एक ही आमदार निवडून येत नाही, त्यामुळे ते इव्हीएमला दोष देत आहेत, अशी टीका आठवले यांनी केले.