प्रकाश आंबेडकरांनी स्टेजवरची नाटक बंद करावीत – आठवले

athawale_

औरंगाबाद: प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय आंबेडकरी ऐक्य शक्य नाही, मात्र त्यांनी स्टेजवरची नाटक बंद करून ऐक्यासाठी प्रत्यक्ष पुढ येण्याची गरज असल्याचा घणाघात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला आज २४ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाआधी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना आठवले म्हणाले कि, कोरेगाव भिमातील घटना हि गंभीर असून दलित विरुद्ध मराठा वाद भडकवण्याच काम काही लोकांकडून केल जात आहे. यामध्ये जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई हि झालीच पाहिजे. महाराष्ट्र बंदच्या दरम्यान मराठा समाजाने कोठेही विरोध दर्शवला नाही उलट त्याला चांगला प्रतिसाद दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर राज्यातील आंबेडकरी नेते समजले जाणारे रामदास आठवले हे थोडेसे मागे पडत असल्याच दिसून आल. तसेच आठवले यांनी ठोस भूमिका न घेतल्याने अनेक रिपब्लिकन (आठवले) गटाच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले. दरम्यान यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या एका हाकेवर महाराष्ट्र बंद झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. यावर विचारल असता ‘मी सरकारमध्ये मंत्री असल्याने मला बंदचे आवाहन करता आले नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला नसता तरी समाज रस्त्यावर येणारच होता’ अस उत्तर रामदास आठवले यांनी दिले. आठवले म्हणाले की प्रकाश आंबेडकर हे नुसती ऐक्याची भाषा करतात मात्र मी प्रत्यक्षात ऐक्यासाठी प्रयत्नशील आहे, एल्गार परिषेदेतील जिग्नेश मेवणीच्या भाषणाचं मी समर्थन करणार नाही कारण मी कधीही नक्षली लोकांचे समर्थन करत नाही अशी टीका आठवले यांनी मेवाणी यांच्यावर केली आहे.

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...