fbpx

सत्ता असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठ्यांसाठी काही केले नाही : आठवले

ramdas-athawale-l

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याचा कायदा करावा व ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वाना सवलती लागू कराव्यात, मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहेत, मात्र सत्ता असताना काँग्रेस व राष्ट्रवादीने मराठय़ांसाठी काही केले नाही, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. आठवले भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी काल नगरमध्ये आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आठवले ?

आरक्षणाची मर्यादा ७५ टक्यांपर्यंत केली तर मराठा समाजासह रजपूत, जाठ, ठाकूर, धनगर या समाजाला आरक्षण देणे शक्य होणार आहे. फडणवीस सरकार मराठा समाजाच्या बाजुने उभा आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याचा कायदा करावा व ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्वाना सवलती लागू कराव्यात, मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहेत, मात्र सत्ता असताना काँग्रेस व राष्ट्रवादीने मराठय़ांसाठी काही केले नाही.