संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा,आठवलेंचा खोचक सल्ला

ramdas aathavle

टीम महाराष्ट्र देशा- भाजपा सरकारमुळे संविधान धोक्यात येत असल्याचा गवगवा विरोधी पक्ष करीत आहे, पण संविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा. संविधान वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आम्ही सक्षम आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.वर्धा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

संविधान जाळल्याने ते धोक्यात येण्याइतके कमजोर नाही, अशी टिपणी त्यांनी केली. दलित हा शब्द अपमानकारक नाही. जो आर्थिक व सामाजिक मागासलेला आहे, तो दलित होय. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या कामगिरीवर जनता खूष असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, देशात एकमेकांविरुद्ध लढण्याचे वातावरण तयार केले जात आहे.

एकटय़ा मोदींविरुद्ध सर्व एकत्र येत आहे. मात्र त्याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना ते ६० वर्षांत जमले नाही ते मोदी सरकारने पाच वर्षांत करण्याचा प्रयत्न केला. भाजप, सेना व आरपीआय सरकारच्या काळात दलितांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या. इंदू मिलची जागा ताब्यात आली असून ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’पेक्षाही मोठे स्मारक ६ डिसेंबर २०२० पूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे २०१९ मध्येही मोदीच परत पंतप्रधान होतील, असे आठवले म्हणाले.

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती, राहुल गांधी पिछाडीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जिवंतपणी मारण्याचे काम कॉंग्रेसने केले – संबित पात्रा

‘शरद पवारांना उपपंतप्रधान पद मिळू शकते’

3 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...