माझा झेंडा निळाच, भाजपशी आघाडीतर निवडणुकीपुरती – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा: भाजपसोबत असणारी युती हि केवळ निवडणुकीपुरती आहे. त्यांचा पक्ष अथवा संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही. आजही माझा झेंडा हा निळाचं असून तो मी कधी सोडणार नसल्याच विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी अंबरनाथ येथे रिपब्लिकन पक्षाच्याचं कार्यकर्त्याने आठवले यांना मारहाण केली होती. युवकाने टोकाचे पाउल उचलण्या मागे आठवले हे भाजपासोबत गेल्याच्या रागाचे सांगतिले गेले होते. त्यामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय केवळ आपल्या एकट्याचा नसल्याच आठवले यांनी सांगितल आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजातील सर्वाना विचारूनच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपशी आघाडीचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता. यापुढे देखील समाजाला विचारात घेवूनच निर्णय घेणार असल्याच आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like
Comments
Loading...