साताऱ्यात पिसाळलेली तीन ‘कुत्री’, भडकलेल्या रामराजेंकडून उदयनराजेंची तुलना ‘कुत्र्याशी’

टीम महाराष्ट्र देशा: नीरा देवधरच्या पाण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता, तर आता उदयनराजे यांना उत्तर देताना रामराजेंची जीभ घसरली आहे.

साताऱ्यात पिसाळलेली तीन कुत्री आहेत, ती जागेवर येईपर्यंत आपणही पिसाळलेलेचं राजकारण करू, असा इशारा देताना रामराजे निंबाळकर यांनी खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. दरम्यान, रामराजे यांच्या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading...

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू – रामराजे निंबाळकर

दरम्यान, यावेळी बोलताना रामराजे यांनी शरद पवारांनी उदयनराजेंना आवराव, अन्यथा आपण पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस आ. गोरे मूळ पदावर येतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी – उदयनराजे

दुष्काळी भागाला पाणी देण्याचा अध्यादेश चौदा वर्षात का काढला नाही, असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, कृष्णा खोऱ्याचे मंत्री तसेच स्वतःला भगीरथ समजणाऱ्याने फक्त लाल बत्तीचा वापर लोकांची खिल्ली उडवण्यासाठी केल्याचा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे. जेव्हा आपण लाल बत्तीच्या गाडीतून फिरतो, पुढे मागे संपूर्ण खात्याचा उपभोग घेतो, संबंधित खात्याचे मंत्री म्हणून काम केले असते तर आज खंडाळा, फलटण, सांगोला आणि पंढरपुरच्या लोकांनी आशीर्वाद दिले असते, असही उदयनराजे म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...