सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांचं निधन

'द्रोणाचार्यां'च्या निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात

टीम महाराष्ट्र देशा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा महागुरू हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आचरेकर यांचे आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

bagdure

रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म १९३२ साली झाला. त्यांनी १९४३ सालापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, पण प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. २०१० मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी १९९० साली त्यांना मानाच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.

दोन महिन्यांपूर्वीच सचिन-कांबळीने घेतली होती भेट
दोन महिन्यांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने रमाकांत आचरेकर सरांची भेट घेतली होती. सचिनने ट्वीट करून याची माहिती दिली होती.आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले.

You might also like
Comments
Loading...